जळगाव : जळगाव शहरातील वृत्तपत्र स्टॉलधारक विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करु नये या मागणीचे निवेदन महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले आहे. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले आणि वृत्तपत्र स्टॉलधारक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक यांनी निवेदन देवून सदर मागणी केली आहे.
सन 2017 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील वृत्तपत्र स्टॉलधारक विक्रेत्यांवर कारवाई न करण्याचे आदेश काढले होते. याबाबतचा तपशील निवेदनात नमूद करण्यात आला आहे. वृत्तपत्र स्टॉलधारक हे अत्यावश्यक सेवांमध्ये मोडले जातात. याबाबत जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले आणि वृत्तपत्र स्टॉलधारक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक यांनी महापौर महाजन यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेला महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निवेदन देतांना जळगाव शहरातील वृत्तपत्र स्टॉलधारक संघटनेचे पदाधिकारी, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, प्रतिभा मेटकर, हर्षाली पाटील आदी उपस्थित होते