नागझिरा अभयारण्यातील कँटीन ठेका सक्तीने रद्द केल्याचा आरोप

गोंदीया (अनमोल पटले) : नागझिरा अभयारण्यातील कॅन्टीन चालवण्याचे टेंडर अचानक रद्द करुन कॅन्टीनचालकासह कर्मचाऱ्यांना मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर काढल्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कॅन्टीनचालक मंगलदीप कृष्णकुमार भावे (चिंचगावटोला, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) यांनी क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र मंगलदीप भावे हे गेल्या 1 ऑक्टोबर 2021 पासून मिळालेल्या पुढील निवीदेनुसार नागझिरा अभयारण्यातील उपहारगृह चालवत होते. सन 2019 पासून त्यांच्या कामाची सुरुवात झाली आहे.

मंगलदीप भावे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की 30 नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता आरएफओ व्ही एम भोसले यांनी कँटीन मध्ये येऊन डीएम आणि उप संचालकांचे आदेश असल्याचे सांगत भावे व त्यांचा अपंग भाऊ अशा दोघांना बाहेर काढत खुल्या जंगलात सोडले. यावेळी सक्तीने पंचनाम्यावर सह्या घेतल्याचे भावे यांचे म्हणणे आहे.

भावे यांनी 30 नोव्हेंबर रोजी मासिक भाडे 71500 जमा केले असून कॅन्टीनच्या नव्या ठेकेदारासोबत अधिकारी वर्गाचे संगनमत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे आपली मानहानी झाली असून आपल्यासह कर्मचारी बेरोजगार झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here