जळगाव : पवन उर्फ घातक सोनवणे या तरुणावर 4 डिसेंबरच्या रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर त्याच्यावर सुरुवातीला शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ नेण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून तो व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगण्यात आले आहे.
घातक याच्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनला काही गुन्हे दाखल असल्याचे समजते. 4 डिसेंबरच्या रात्री घातक याच्यावर सागर कंडारे व काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला होता. प्रत्युत्तरादाखल घातक याने देखील प्रतिस्पर्धी तरुणांवर हल्ला केला होता. त्यात एका जखमीवर उपचार सुरु होते. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला भादवि 307 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.