चंद्रपूर : वाटेत अचानक बिबट्या प्रकट झाल्यामुळे भरधाव दुचाकीवरील सुटलेल्या नियंत्रणामुळे झालेल्या अपघातात सहायक फौजदाराचा मृत्यू ओढवला आहे. अविनाश पडोळे असे मृत्युमुखी पडलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे.
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेल्या बॉटनिकल गार्डन टर्नवर सदर दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी दुपारी सहायक फौजदार अविनाश पडोळे बल्लारपूर येथून शहराच्य दिशेने त्यांच्या ताब्यातील मोटर सायकलने येत होते. चंद्रपूर – बल्लारपूर दरम्यान त्यांच्यासमोर अचानक एक बिबट्या आला. बिबट्या रस्ता ओलांडत होता. बिबट्या बघून पडोळे यांचे मोटार सायकलवरील नियंत्रण सुटले व ते पडून जखमी झाले. मोठ्या प्रमानात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.