बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस

गोंदिया (अनमोल पटले) : बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा प्रकार वन विभागाच्या कारवाईत उघड झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे बिबट्याची कातडी आणि अवयवांची विक्री होणार असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विभागीय वन अधिकारी (दक्षता) नागपूर आणि गोंदिया वन विभागाच्या संयुक्त पथकाने सालेकसा तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा लावण्यात आला. या सापळा कारवाईत बिबट्याच्या अवयवाची विक्री करण्याऱ्या 12 आरोपींना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, पंजे, 4 नखे, तुटलेले 2 सुळे व इतर 13 दात, दहा मिश्या व तीन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.
आरोपी सध्या तीन दिवसांच्या वनकोठडीत आहेत. तपास वनक्षेत्राधिकारी सालेकसा अभिजित इलमकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here