पुणे : गोल्ड मॅन म्हणून ख्याती असलेल्या पुण्याच्या तरुणाची कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ परिसरात गोळीबाराच्या माध्यमातून हत्या करण्यात आली आहे. दुपारी झालेल्या या थरारक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
समीर उर्फ़ सम्या मणुर (40, रा. आंबेगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. गोल्डमॅन म्हणून तो परिचित होता. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.