जळगावला एसटीचे नव्याने 51 कर्मचारी निलंबित

On: December 7, 2021 8:48 PM

जळगाव : वारंवार कामावर बोलावूनही कामावर न येता कामगारांच्या संपात सहभागी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील 51 एसटी कामगारांवर महामंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे.15 कर्मचा-यांना बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीवर एसटीचा कामगारवर्ग ठाम आहे. यापूर्वी 281 कामगारांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. त्यात नव्याने 51 कामगारांची भर पडली असून ती संख्या 332 झाली आहे. जेमतेम हजर झालेल्या चालक, वाहकांवर भुसावळ, अमळनेर व जळगाव आगारातून तोडकीमोडकी प्रवासी सेवा दिली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment