साथीदार संदीप बेनीवाल यास 20 वर्षांची शिक्षा
नवी दिल्ली : दिल्ली शहरातील सर्वात मोठे सेक्स रॅकेट चालवणा-या गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबन (35) या तरुणीला न्यायालयाने 24 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. स्थानिक न्यायालयाने ही शिक्षा ठोठावताना त्यात नमुद केले आहे की एक महिला म्हणून सर्व मर्यादा तिने ओलांडल्या आहेत. त्यामुळेच ती या कठोर शिक्षेस पात्र आहे. अपहरण, वेश्या व्यवसाय आणि अनैतिक तस्कर, चार वर्षाच्या अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना देहविक्रीस भाग पाडणे अशा विविध आरोपांखाली तिला शिक्षा सुनावण्यात आली.
सोनूला न्यायालयाने 24 वर्षांची शिक्षा सुनावली असून तिचा साथीदार संदीप बेनीवाल याला देखील २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. दरम्यान अल्पवयीन मुलीला सात लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोनू पंजाबनचा जन्म पूर्व दिल्लीत झाला. दक्षिण दिल्लीच्या उच्चभ्रू वस्तीत तिने काही वर्षापुर्वी घर घेतले होते. तेव्हापासून ती दिल्ली पोलिसांच्या निशान्यावर होती. देशातील जवळजवळ सर्व राज्यात तिच्या वेश्या व्यवसाय फोफावला होता.
सोनू पंजाबन उर्फ गीता अरोराचे देशातील विविध राज्यातील वेश्याव्यवसायावर नियंत्रण होते. ती तो व्यवसाय चालवत होती. दक्षिण दिल्लीतून तिने या व्यवसायाची सुरुवात केली होती. अभिनेत्री किंवा मॉडेल बनण्याची तिव्र इच्छा असणाऱ्या मुलींना ती आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यातून ती त्यांचे अपहरण करुन त्यांना या व्यवसायात बळजबरी आणत होती. लैंगिक अत्याचार करुन ती त्यांना तयार करत असे. आपल्या ताब्यातील मुलींना ती हायप्रोफाईल लोकांकडे पाठवत असे. सन 2011 मधे पोलिसांच्या माहितीनुसार, तिच्याकडे अनेक हायप्रोफाईल देहविक्री करणा-या महिला होत्या. त्यांना ती विविध फाइव्ह स्टार हॉटेल आणि फार्म हाऊसवर पाठवत होती.
हरियाणाच्या झज्जरमधील एका खून प्रकरणात तिला अटक झाली होती. सोनूला सन 2007 मधे प्रथमच एका तस्करी प्रकरणी अटक झाली होती. त्यात ती जामीनावर बाहेर आल्यानंतर तिला पुन्हा 2008 मधे अटक झाली होती. सन 2011 मधे एजंटच्या रुपात पोलिसांनी तिला पुन्हा अटक केली होती. यावेळी तिच्यासह तिचे चार साथीदार देखील अटक करण्यात आले होते. मात्र या प्रकरणात ठोस पुरावा मिळाला नव्हता. त्यामुळे ती पुन्हा तुरुंगातून बाहेर आली होती.