जळगाव : धरणगाव – अमळनेर रस्त्यावरील एकमेव शासकीय गायरान जमीनीवर असलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आज भव्य आंदोलन करण्यात आले.
शांततेच्या मार्गाने करण्यात आलेल्या या मूक मोर्चा रुपी आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मानवसेवा संकल्प प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या माध्यमातून या गायरान जागेवर अतिक्रमण केल्याने जनभावना तीव्र झाल्याचे यावेळी दिसून आले.
आखिल भारतीय संत समिती निर्मल आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जनार्धनहरिजी महाराज तसेच रामेश्वर येथील महंत प. पू. स्वामी नारायणाचार्य व श्री श्री 1008 महामंडलेश्वर ह. भ. प. भगवानदासजी महाराज यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चाचे रूपांतर शिवाजी महाराज चौकात सभेत झाले. त्यानंतर मोर्चाला संत मंडळींनी संबोधित केले. ॲड. राहुल पारेख यांनी गायरान बचाव समितीच्या वतीने प्रास्ताविक केले. सभेनंतर सर्व संत, महंत,मान्यवरांनी तहसिलदारांना निवेदन सादर केले.









