हिसकावलेल्या मोबाईलसह फरार आरोपीस अटक

On: December 9, 2021 4:19 PM

जळगाव : रस्त्याने चालणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल भरधाव दुचाकीवरुन हिसकावणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी दोन गुन्हे जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आले होते.
या गुन्ह्याच्या तपासात संदीप राजू कोळी (रा कुरंगी) यास ताब्यात घेण्यात आले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात त्याचा साथीदार प्रवीण भाईदास कोळी (रा विखरण) याचादेखील सहभाग होता. घटना घडल्यापासून प्रवीण कोळी फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते.
पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील स.पो.नि. महेंद्र वाघमारे, पो.ना. गणेश पाटील, पो.ना. सलीम तडवी, पो.कॉ. पहुरकर, पो.कॉ. योगेश साबळे यांनी त्यास 8 डिसेंबर रोजी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment