जळगाव : महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक मधून डीझलची चोरी करणा-या आंतरराज्य टोळीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीतील तिघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. मुक्ताईनगर ते भुसावळ दरम्यान उभ्या ट्रकमधील डिझलची चोरी करणा-या टोळीची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला तापासकामी रवाना केले होते.वरणगाव नजीक खुशाल ढाब्याजवळ सदर संशयित टाटा कंपनीचे चारचाकी वाहन व संशयित चोरटे पोलिस पथकाच्या हाती लागले.
रईस हाशिम शेख (भिवंडी – ठाणे), रुआब अली जलील अहमद (मोहूआबुजुर्ग कुशीनगर उत्तर प्रदेश), अनिल सुभाष सरोदे (भिवंडी – ठाणे), अशा तिघा जणांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 4 लाख 79 हजार 10 रुपये किमतीचे डीझल हस्तगत करण्यात आले. त्यांनी वरणगाव आणि भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीत इंधन चोरी केल्याचे कबुल केले आहे. याप्रकरणी वरणगाव आणि भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. जालिंदर पळे, पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, हे.कॉ.सुनील दामोदरे, जयंत चौधरी, दीपक पाटील, महेश महाजन, पोलिस नाईक नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, रवींद्र पाटील, राहुल बैसाने, पो.कॉ.सचिन महाजन, चालक अशोक पाटील, मुरलीधर बारी आदींनी या कारवाई सहभाग घेतला.







