गोंदिया (अनमोल पटले) : तिरोडा येथे 1 ते 5 डिसेंबर पर्यंत स्व. मोतीलाल पटेल व स्व. गो. मो. कोलते सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शितकालीन खेळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया जिल्हा वुशु, आर्चरी, कराटे, किकबॉक्ससिंग, कबड्डी, आरोबिक असो. व तालुका क्रीडा समिती तिरोडा द्वारे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या शिबीराचे उद्घाटन मशाल प्रज्वलीत करुन करण्यात आले होते.
या शिबिरात एकुण 345 प्रशिक्षनार्थीनी सहभाग घेतला होता. यावेळी रक्तदान शिबिर देखील झाले.
या शिबिराचे आयोजन तालुका क्रीडा समिती,तिरोडा क्रीडा संयोजक सुनील शेंडे,तालुका क्रीडा समिती चे अध्यक्ष राजेश असाटी, गुणवंत क्रीडा पुरस्कारथी संजय नागपुरे, संदीप मेश्राम, सुरेश शहारे, सुनील ठाकरे ,प्रदीप मेश्राम,दीपक घरजारे,वीकेश मेश्राम यांनी केले होते.









