वाळू तस्करांची मुजोरी महिला तहसिलदारांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर

On: July 23, 2020 8:10 PM

पंढरपूर : सोलापूर जिल्हयात वाळू तस्करांचा उद्दामपणा वाढला आहे. आज या वाळू तस्करांनी थेट महिला तहसिलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालत त्यांना जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला. सांगोला जँकवेल परिसरातील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरु होता. त्या ठिकाणी तहसीलदार वैशाली वाघमारे आपल्या कर्मचा-यांसह कारवाईसाठी गेल्या होत्या.

त्या कारवाई करण्याच्या बेतात असतांना वाळू तस्करांनी तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा जिवघेणा प्रकार केला. 21 जुलैच्या सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसात भादंवि 307, 353, 332, 379, 506, 34 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 9 व 15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment