मोबाईल हिसकावणारा मॉडेल जेरबंद

On: December 13, 2021 7:07 PM

जळगाव : जळगाव शहरात रस्त्याने चालणाऱ्या पादचा-याचा मोबाईल हिसकावुन जबरी चोरी करणारा अट्टल चोरटा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे.

अक्षय मुकेश अटवाल उर्फ मॉडेल रा.गुरूनानक कॉलनी जळगाव असे चोरट्याचे नाव असून त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने जिल्हापेठ पोस्टे हद्दीतुन मोबाईल फोनची जबरी चोरी केली आहे. या गुन्ह्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या मागावर होते.

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, पोना नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी अक्षय मुकेश अटवाल उर्फ मॉडेल यास जळगाव शहरातील काटयाफाईल चौकातून अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून चोरीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याचे दोन साथीदार असून ते फरार आहेत. अटकेतील मॉडेलकडून जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.

आरोपीस पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटकेतील आरोपी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी जळगांव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी या पोलिस स्टेशनला मोबाईल फोन हिसकावुन जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment