दुचाकीस्वारांनी लांबवला वार्ड बॉयचा मोबाईल

On: December 14, 2021 8:43 PM

जळगाव : खासगी रुग्णालयात काम करणा-या वार्ड बॉयचा मोबाईल भरधाव वेगातील दुचाकीस्वार तरुणांनी लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याघटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश मुकुंदा गुरव (32) रा. रेणुकानगर जळगाव असे तक्रारदार मोबाईल धारक वार्डबॉय तरुणाचे नाव आहे. दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी राजेश गुरव रुग्णालयातील कामकाज आटोपून नेहमीप्रमाणे आपल्या सायकलने घरी जात होता. त्यावेळी महामार्गावर रत्नाकर नर्सरीजवळ पल्सर मोटारसायकलवर दोन तरुण त्याच्या जवळ आले. भुसावळला जाण्याचा रस्ता विचारण्याचा बहाणा करत त्यांनी त्यांच्या जवळ असलेला मोबाईल हिसकावत पलायन केले.

मोटर सायकल वरिल दोघे तरुण पंचवीशीच्या वयोगटातील होते. त्यांनी नाका तोंडाला काळा रुमाल, अंगात काळ्या रंगाचे स्वेटर घातलेले होते. या प्रकरणी पोलिस उप निरीक्षक रवींद्र गिरासे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment