पान मसाला, तंबाखूचा साठा बाळगणारा अटक

On: December 16, 2021 9:14 PM

जळगाव : मानवी आरोग्यास अपायकारक तसेच बंदी असलेल्या तंबाखू व पानमसाला बाळगणा-याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कायदेशीर कारवाई केली आहे. त्याच्या ताब्यातून 10 हजार 970 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राज नुरमोहम्मद तडवी (25) रा. मदीना चौक, शाहुवालीया मशीद जवळ, तांबापुरा, जळगाव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

कोम्बींग ऑपरेशन राबवत असतांना स.पो.नि.प्रमोद कठोरे सो. यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यासह पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे, पो.ना. गणेश शिरसाळे, पो.ना.महेंद्र गायकवाड, पो.ना. प्रशांत चौधरी, सुधीर साळवे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. 14 व 15 डिसेंबरच्या मध्यरात्री तांबापुरा शाहुवालीया मशिद परिसरातून राज तडवी यास ताब्यात घेतले. पोलिस नाईक सुधीर सावळे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment