शेतक-यांची फसणुक करणारा एलसीबीने केला जेरबंद

On: December 18, 2021 7:57 AM

जळगाव : कापसाचा व्यापारी असल्याचे भासवून शेतक-यांकडून खरेदी केलेल्या कापसाचे पैसे न देता फसवणूक करणा-या भामट्यास जळगाव एलसीबी पथकाने अटक केली असून त्यास पुढील तपासकामी पहुर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

12 नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तींनी आपण कापूस खरेदी करणारे व्यापारी असल्याचे भासवत पहूर येथील बाजारात शेरी येथील शेतकऱ्यांकडून 11लाख 83 हजार 875 रुपये किमतीचा 143.50 क्विंटल कापूस खरेदी केला. मात्र खरेदी केलेल्या कापसाचे पैसे शेतक-यांना न देता फसवणुक केली होती.

शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आपले सहकारी पोलीस अंमलदार पोउनि अमोल देवडे, सफौ अशोक महाजन, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना रणजित जाधव, पोना किशोर राठोड, पोना कृष्णा देशमुख, पोकॉ विनोद पाटील,पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ मुरलीधर बारी तसेच पहुर पोलीस स्टेशनचे गुन्हा तपासी अंमलदार पोउनि संजय बनसोडे यांच्या सहकार्याने या गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेतला. या गुन्हयातील आरोपी अशिषभाई रमणीकभाई हिंगरिया (रा. राजकोट गुजरात) यास राजकोट येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून गुन्हयात वापरलेला सात लाख रुपये किमतीचा ट्रक व रोख एक लाख असा एकुण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment