सत्तूरचे 16 वार; भरदिवसा झाला तरुणाचा खून

On: July 24, 2020 7:32 PM

कोल्हापूर : आज भर दुपारी कोल्हापूर येथे हत्येची भीषण घटना घडली. कागलच्या भरवस्तीत तरुणाच्या खूनाच्या घटनेने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे. अक्षय विनायक सोनुले असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कागल येथील महालक्ष्मी मंदिरसमोरच या खूनाचा प्रकार घडला. अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी ही हत्या केली आहे.

आरोपी तरुणांनी मयत अक्षय सोनुले याच्या शरीरावर सत्तूराने 16 वार केले. शरीरावर खोल जखमा झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. अक्षयचा मृतदेह विच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात रवाना करण्यात आला. आरोपी कोण होते? त्यांनी अक्षयची हत्या का केली? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment