नकली नोटा तयार करणा-या टोळीचा पर्दाफाश

औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलिसांच्या पथकाने नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बनावट नोटा तयार करण्याच्या साहित्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय 1 लाख 20 हजार रुपयांच्या नकली नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पुंडलिक नगर परिसरात सुरु असलेला हा बनावट नोटांचा उद्योग उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

सर्वप्रथम रघुनाथ ढवळपुरे या संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासाला सुरुवात झाली. जामीनावर बाहेर असलेल्या समरान उर्फ लकी रशीद शेख व त्याचा साथीदार नितीन चौधरी असे दोघे जण मुकुंदवाडी परिसरतील भाड्याच्या खोलीत नकली नोटा तयार करण्याचा उद्योग करत होते. तयार करण्यात आलेल्या नकली नोटा अक्षय अण्णासाहेब पडूळ व दादाराव पोपटराव गावडे हे दोघे चलनात आणण्याचे काम करत होते.

समरान उर्फ लकी रशीद शेख, नितीन कल्याणराव चौधरी, अक्षय अण्णासाहेब पडूळ, दादाराव पोपटराव गावडे आणि रघुनाथ ढवळपुरे असे सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या ताब्यातून 1 लाख 20 हजार रुपयांच्या नकली नोटा व गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा लोगन कार, 5 मोबाईल असा 3 लाख 10 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here