अत्याचारानंतर चिमुकलीस फाशी देण्याचा प्रयत्न, आरोपीचे पलायन

On: July 24, 2020 10:21 PM

खामगाव: अंगणात खेळणा-या एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाकडून अत्याचार करण्यात आला. नांदुरा येथील या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. अत्याचारानंतर विकृत नराधमाने बालिकेला घटनास्थळी फाशी देण्याचा देखील प्रयत्न केला.

दरम्यान बालिकेच्या ओरडण्यामुळे पशु चिकित्सालयातील एक जण तिच्या मदतीला धावून आला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला तरी नराधम पळून जाण्यात यशस्वी झाला. चिमुकलीला  नांदुरा येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

नराधमाच्या अत्याचारामुळे प्रकृती बिघडलेल्या चिमुकलीला खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू होती. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment