महिला वकिलावर पोलिसाचा बलात्कार?

पुणे : महिला वकिलावर एका पोलीस कर्मचा-याने बलात्कार व फसवणूक केल्याच्या आरोपाखाली चतुशृंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे. लक्ष्मण गंगाधर राऊत (33) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित पोलीस कर्मचा-याचे नाव आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत असलेल्या संशयित पोलीस कर्मचा-याविरुद्ध महिला वकिलाने आरोप केले आहेत. एका विवाह संकेत स्थळावर संशयित पोलीस कर्मचारी व महिला वकील यांची ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांना आपल्या मोबाईल क्रमांकाची देवाण घेवाण केली होती. त्यानंतर विविध लॉजेसवर दोघांमध्ये शरीरसंबंध आल्याचे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे. दोन वर्षानंतर संशयिताने फिर्यादी व पिडीत महिला वाकीलासोबत लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीतेने विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here