जळगाव : जळगाव शहरातील विविध भागात सुरु असलेल्या सट्टा मटका पेढ्यांवर कारवाया करण्यात आल्या. एकाच दिवशी विविध ठिकाणी विविध पथकांच्या माध्यमातून या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, एल. एच. पाटील हायस्कुल परिसर, सिंधी कॉलनी भाजीपाला बाजार परिसर, शेरा चौक एमआयडीसी, अब्दुल हमीद चौक तांबापुरा, शंकर प्लाझा गुजराल पेट्रोल पंप परिसर, मनपा शाळा क्रमांक तीनच्या मागे, सोमाणी मार्केट पिंप्राळा, इस्लामपुरा शनिपेठ अशा विविध नऊ ठिकाणी हि छापेमारी करण्यात आली.
या धाडीत पत्ता जुगाराच्या एका व सट्टा जुगाराच्या 29 जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 90 हजार 942 रुपये रोख, सट्टा जुगाराच्या साहित्यासह 1 लाख 51 हजार रुपयांच्या तीन मोटार सायकली, 31 हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकुण 2 लाख 41 हजार 942 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने सदर कारवाई करण्यात आली.