जळगाव : आरोग्यास घातक असलेल्या व शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू, तंबाखूजन्य पानमसाला विक्रीसाठी बाळगणा-या दोघांविरुद्ध आज एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.
पहिल्या कारवाईत शहरातील अयोध्या नगर परिसरातील सद्गुरु प्रोव्हिजन समोर असलेल्या घरातून प्रमोदकुमार नरेश सैनी याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 2 लाख 72 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला. या मुद्देमालात करमचंद प्रीमियम पान मसाला, जाफरानी जर्दा यांचा समावेश आहे. पोलीस नाईक सचिन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गोसावी करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर मुद्देमाला कोणाच्या मालकीचा आहे याबाबत शोध सुरु आहे. या कारवाईत अमोल मोरे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. मिलिंद सोनवणे, पोलीस नाईक मुदस्सर काझी विकास सातदिवे, इमरान सैय्यद, सुधीर सावळे, पो.कॉ. गोविंदा पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, महिला पोलीस कर्मचारी आशा पांचाळ आदींनी सहभाग घेतला.
दुस-या कारवाईत तांबापुरा मासळी बाजार परिसरातील किराणा दुकानदार गजानन विष्णू भोई यास मुद्देमालासह ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. त्याच्या कब्जातून 2 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला. यामध्ये विमला पाना मसाला व व्ही-1 तंबाखू आदींचा समावेश आहे. पो.कॉ. इमरान रहीम बेग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक अमोला मोरे यांच्यासह पोलीस उप निरीक्षक रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. नितीन भास्कर पाटील, मुदस्सर काझी, योगेश बारी आदिनी सहभाग घेतला.