मयत अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणी अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर अनोळखी मृतदेह सामान्य रुग्णालयात दाखल असून नातेवाईकांचा शोध सुरु आहे. सदर मयत इसमाचा रंग सावळा असून उंची 5 फुट 8 इंच आहे. शरीरयष्टी सतपातळ असून अंगात राखाडी रंगाचे स्वेटर, निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे.

मेहरुण परिसरात सदर इसम मयत अवस्थेत पडून होता. परिसरातील सुज्ञ नागरिकांनी त्याला सामान्य रुग्णालयात आणून दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळवली. सोबतच्या फोटोतील इसमाची ओळख पटल्यास तातडीने एमआयडीसी पोलीस स्टेशन (0257 – 2210500) अथवा पोलीस उप निरीक्षक दीपक जगदाळे (9028222666) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here