जळगाव : शिरसोली येथील हेमंतकुमार (राजुभाऊ) चौधरी यांची कन्या कु. किरण हेमंतकुमार चौधरी हिने बी. ई. (मॅकेनिकल) जिआरई परीक्षेत 350 गुण मिळवत प्राविण्य मिळवले आहे. एम.एस. (मास्टर ऑफ सायन्स) या विद्याशाखेत शिक्षण घेण्यासाठी तिची इटली येथील जगप्रसिद्ध विद्यापीठ “जेनोवा” येथे निवड झाली आहे. तिच्या निवडीबद्दल सत्कार व अभिनंदनपर कार्यक्रमाचे शिरसोली येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात आप्तेष्ठ, नातेवाईक, परिसरातील ज्येष्ठ नागरिक व गावकऱ्यांनी कु.किरण हिचा सत्कार केला. तसेच तिला भावी आयुष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कु. किरण हिची इटलीला जाण्यासाठी झालेली निवड सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत यावेळी गौरी उद्योग समुह, वावडदाचे चेअरमन तथा जळगाव खान्देश कुणबी मराठा वधुवर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब सुमित पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी शिरसोली येथील पंचायत समिती माजी सभापती नंदु पाटील, सरपंच बापु रावसाहेब पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, माजी सरपंच प्रणय माळी, हॉटेल धनश्रीचे संचालक निलेशभाऊ बारी, प्रमोद मिस्तरी, आंबा सोनार, प्रकाश जगताप, सुभाष सोनगिरे, विवेकानंद इग्लिश मिडीयम स्कुलचे विजय पाटील, शिक्षक वाणी आदी उपस्थित होते.