नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई

On: January 14, 2022 5:50 PM

जळगाव : जळगाव शहरातील तुळजामाता नगर परिसरात नायलॉन मांजा विक्री करणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. मुकेश अशोक वडनेरे (27) तुळजामाता नगर मेहरुण – जळगाव) असे पोलिसांनी मांजासह ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून सतराशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचारी साईनाथ मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इमरान अली सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, मुकेश पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment