जाळून घेतल्याने पती पत्नीचा मृत्यू

On: January 16, 2022 2:50 PM

भंडारा : पती पत्नीचा वाद विकोपाला जावून दोघे आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या घटनेत तीन वर्षाचा चिमुकला मात्र बचावला आहे. कारधा येथे मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महेंद्र सिंगाडे (38) व मेघा सिंगाडे (30) अशी आगीत मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नीचे नाव आहे. दोघातील वाद विकोपाला गेल्याने आधी महेंद्रने स्वत:वर रॉकेल ओतून नंतर पत्नी मेघावर ओतले. त्यात दोघे ठार झाले. चिमुकल्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. मयत दोघांचे शव विच्छेदन सुरु असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment