सांगली : सांगली शहराच्या इंदिरानगर भागात परिसरात शुक्रवारी दिवसभरात पंचवीस कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे या भागात कंटेनमेंट झोन करण्यात आला होता. मात्र आज सकाळी या भागातील नागरिकांनी संरक्षक यंत्रणा नेस्तनाबुत करून टाकली. महापालिका प्रशासनाने तातडीने या भागातील सर्व परिसर. लोखंडी पत्रे व जाळीने बंद केला होता. याबाबत स्थानिक नागरिकांचा विरोध होता.

नागरिकांनी कंटेनमेंट झोन उध्वस्त केल्याचे समजतात विश्रामबाग पोलिस स्टेशनची कुमक तैनात करण्यात आली आहे. दुपारी या भागातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे झोन ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर नागरिक शांत झाले. पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.