जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती – 2019 ची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी मुळ कागदपत्रांच्या फेर पडताळणी व भरती निकषांच्या अधीन राहून तयार करण्यात आली होती. सदर तात्पुरती यादी जळगाव पोलीस दलाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीबाबत हरकती मागवण्यात आल्या होत्या. निवड मंडळाच्या पडताळणीनंतर पुढील सुधारित तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सुधारित तात्पुरत्या निवड यादीमधील पोलीस भरतीच्या कार्यपद्धतीमधील निर्देशानुसार फेर पडताळणीनंतर अंतिम निवड यादी तयार केली जाणार आहे. सुधारित तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी 24 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मंगलम हॉल पोलीस मुख्यालय येथे न चुकता दोन फोटो व सर्व शैक्षणिक मुळ कागदपत्रांसह छायांकित प्रतीच्या दोन संचासह उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस भरती प्रक्रीयेबाबत अंतिम निर्णय पोलीस भरती निवड समितीचा राहणार आहे.