जळगाव : अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अंतर्गत 75 हजार रुपयांचा धनादेश मिळाला आहे. योगेश ज्ञानेश्वर वराडे असे अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद येथील विद्यार्थ्याचे दोन वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते. या मदतीसाठी शालेय व्यवस्थापनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनार यांच्या हस्ते सदर धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक बच्छाव, पर्यवेक्षक भंगाळे, ज्यु. कॉलेजचे विभाग प्रमुख योगराज चिंचोरे, निलेश पवार, शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण, वाघ आदी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन डॉ. केदार थेपडे यांच्यासह माजी मुख्याध्यापक पी.डी.पाटील, उपमुख्याध्यापक खोडपे, ज्यु. कॉलेज शिक्षक बंधू भगिनी तसेच माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी, शाळेचे सर्व विद्यार्थी व पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.