धुळे : तथाकथित पीएसआय व लाचेची मागणी करणा-या सेवानिवृत्त सहायक फौजदाराचा शोध घेण्यासाठी लाचलुचपत विभागाने तीन पथकांची निर्मिती केली असून रवाना केली आहेत. नाशिक येथील बांधकाम व्यावसायिकाकडे गुन्ह्यात जप्त केलेली कार सोडवण्याकामी अभिप्राय देण्यासाठी आखाडे आडनावाच्या सहायक फौजदाराने 2 लाख 80 हजार रुपयांची लाच तडजोडीअंती मागितली होती.
या कामात लाच स्वीकारण्यासाठी परेश गुरव नामक पंटरने उडी घेतली होती. याप्रकरणी मंगळवारी धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे एसीबीकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला असून उप अधीक्षक अनिल बडगुजर या प्रकरणी तपास करत आहेत. फरार आखाडे याने स्वेच्छानिवृत्ती घेतली असून सेवा समाप्तीचा जंगी कार्यक्रम देखील घेण्यात आला होता.