तरुणाची गळफास घेत आत्महत्या

On: January 21, 2022 2:41 PM

जळगाव : जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरातील तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. समीर रामदास बांदल असे गळफास घेत आपले जीवन संपुष्टात आणणा-या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

20 जानेवारी च्या रात्री आठ वाजता घरात कुणी नसतांना समीर बांदल याने आपले जीवन संपवले. त्याचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याला नातेवाईकांनी तातडीने दवाखान्यात नेले. मात्र त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. पोलीस नाईक ललित भदाणे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment