अपहृत बालकाचा शोध सुरुच

On: January 22, 2022 11:14 AM

जळगाव : मित्राचा फोन आल्यानंतर त्याच्याकडे जातो असे सांगत घराबाहेर गेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय १४ वर्ष ) रा. जलाराम नगर सावखेडा शिवार जळगाव) असे अपहृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरुषोत्तम पाटील यास कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असून कुणाला काही माहिती मिळाल्या पोलीस उप निरीक्षक नयन पाटील यांच्याशी ७०२०६९४७९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment