पोलिसांच्या मदतीने सावकाराच्या ताब्यातील बाळ मातेकडे सुपूर्द

On: January 22, 2022 12:18 PM

सातारा : तीस हजार रुपये कर्जाच्या परताव्यासाठी सावकाराने चक्क आईच्या कुशीतील बाळालाच ताब्यात घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीड महिन्यांचे बाळ पोलिसांकडे केलेल्या ताक्रारीनंतर आईच्या ताब्यात देण्यात आले. सातारा शहरातील या घटनेने खळबळ माजली आहे.

सातारा शहरातील सदर बझार भागातील एका खासगी सावकाराकडून या दाम्पत्याने तीस हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या सावकाराने आईच्या ताब्यातील बाळाला उचलून नेले होते. चार महिन्यांपासून सावकाराच्या ताब्यातील बाळ परत देत नसल्याची तक्रार दाम्पत्याने पोलिसांकडे केली. सातारा येथील अभिषेक कुचेकर या तरुणाने संजय बाबर व अश्विनी पवार-बाबर या दांपत्याकडून तीस हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी बाबर यांनी 60 हजार रुपये परत देखील केले होते. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment