पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध कारवाई

On: January 23, 2022 11:01 AM

जळगाव : गावात वाद सुरु असून तातडीने येण्याबाबत खोटी माहिती देणा-या तरुणाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. धनराज कडू भिल (डांगर ता. अमळनेर जिल्हा जळगाव) असे कारवाई झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने त्याच्या मोबाइलवरुन डांगर गावात वाद सुरु असल्याची खोटी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला 112 या क्रमांकावर दिली होती.

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र कुठेही वाद नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. धनराज भिल याचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले. फोन लावल्यावर पोलीस येतात अथवा नाही याची खात्री करण्यासाठीच आपण फोन केला होता असे त्याने स्पष्ट केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment