जळगाव : खुनाच्या गुन्हयातील संशयीत आरोपीने धुळे सब जेलमधून पलायन केले होते. त्यास जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने आज शिताफीने आपल्या जाळ्यात बंदिस्त केले. फरार आरोपी सुरेश गुमान पावरा हा जळगाव येथे येणार असल्याची गुप्त माहिती जळगाव एलसीबी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार सापळा रचून त्यास अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध शिरपूर पोलिसात भाग 5 गु.र.नं.122/20 भा.दं.वि 302 याशिवाय धुळे शहर पोलिसात गु.र.नं.119/20 भा.दं.वि 224 नुसार गुन्हा दाखल आहे. तो धुळे सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. 22 जुनच्या पहाटे दोन वाजता त्याने जेल मधून पळ काढला होता.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. सुधाकर लहारे, हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, परेश महाजन, दीपक शिंदे, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. आरोपीस धुळे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.