जळगाव : एमआयडीसी परिसरातील श्रीराम पॉलिमर्स या कंपनीत 13 हजार 600 रुपये किमतीच्या विविध वस्तूंची चोरी उघडकीस आली असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीच्या व्ही सेक्टर मधील या कंपनीत चटई तयार करण्याकामी लागणा-या दाण्याची निर्मिती होते.
17 ते 19 जानेवारी या कालावधीत सदर कंपनी बंद होती. या कालावधीत पाण्याची मोटर, शिलाई मशीन, दाणा मशिनचे दोन कटर, 100 मीटर वायर, दाणा मशिनला आवश्यक असणा-या तिन पुली असा एकुण 13 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकीता राजेंद्र महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.