खंडणी मागण्यासाठी जाणारे तिघे पिस्तुलासह ताब्यात

काल्पनिक छायाचित्र

औरंगाबाद : पिस्तूलच्या धाकावर व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या तिघांना पुंडलीकनगर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. विघातक कृत्य होण्यापुर्वीच तिघांना पिस्तुलासहा ताब्यात घेत अटक केल्यामुळे अनर्थ टळला आहे.

या खंडणीच्या कटाची आखणी सहा महिन्यांपुर्वीच करण्यात आली होती. हितेंद्र नवनाथ वाघमारे (24), अनिकेत रावसाहेब वडमारे, ओम राजू कायंदे (22) या तिघांना पिस्तुल व जिवंत काडतुसासह पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

या कटाबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी आपल्या सहका-यांसह सापळा रचून तिघांना ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाई केली. दरम्यान पोलिस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच ओम नावाचा साथीदार पलायन करण्यात यशस्वी झाला. मात्र त्याला देखील शोधून काढण्यात आले. यातील हितेंद्र वाघमरे याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here