आजचे राशी भविष्य (6/3/2022)

आजचे राशी भविष्य (6/3/2022)

मेष : वाद संपुष्टात येवून सामाजिक प्रतिमा वृद्धींगत होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : दिवस व्यस्त राहील. जुनी येणी वसुल होण्याची शक्यता. पारिवारिक वातावरण उत्साही राहील.

मिथुन : अनावश्यक प्रवास आणि खर्च होण्याची शक्यता. जवळच्या व्यक्तीच्या संपर्कातून कामे पुर्ण होतील.

कर्क : आपल्या अंगी असलेल्या कला-गुणांना वाव मिळेल. मुलांच्या प्रगतीने समाधान लाभेल.

सिंह : कौटुंबिक वातावरण प्रसन्न असेल. मध्यम फलदायी आणि सकारात्मक दिवस राहिल.

कन्या : नवीन ओळखी लाभदायक ठरण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील.

तुळ : आक्रमकतेला काही प्रमाणात आवर घाला. लहान मोठे वाद टाळून ते सामंजस्याने सोडवा.

वृश्चिक : प्रलंबित कामे मार्गी लागतील, वाहन खरेदीचा योग जुळून येण्याची शक्यता.

धनु : व्यवसाय आणि गुंतवणुकीतील अडचणी दुर होतील. पालकांचे शुभाशिर्वाद उपयोगी ठरतील.

मकर : लहान मोठे आजार असल्यास अंगावर काढू नका. विवाह विषयी कामे मार्गी लागण्याची शक्यता.

कुंभ : खेळाडूंना उत्तम दिवस असेल. मानसिक शांतता तसेच मान सन्मान मिळेल.

मीन : व्यापार विस्तारासाठी खर्च करावा लागू शकतो. हाती घेतलेली विधायक कामे पुर्णत्वास जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here