पॅरोलवर आलेल्या कैद्याची आत्महत्या

On: July 26, 2020 6:45 PM

बीड : पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणारा कैदी पॅरोलवर गावी येताच त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज बीड जिल्हयात घडली. गेवराई तालुक्यातील जातेगाव या गावी हा प्रकार उघडकीस आला आहे. भरत ताराचंद पवार असे आत्महत्या करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. भरत पवार हा एक महिन्याच्या पॅरोल रजेवर नुकताच बाहेर आला होता.

दोन दिवसांनंतर त्याची पॅरोल रजा संपणार होती. मात्र आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जातेगाव गावखोर तांडा कॅनलच्या शेजारी असलेल्या झाडाला गळफास घेत त्याने आपली जीवन यात्रा संपवली. चार वर्षापूर्वी तो पत्नीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेला होता.

गेल्या दोन दिवसांपासून भरत कोणत्या तरी मानसिक तणावात वावरत होता. दोन दिवसांनी त्याला पुन्हा औरंगाबादच्या हरसुल कारागृहात जायचे होते. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी तलवडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment