मद्यधुंद चालकाने उडवली अनेक वाहने

On: July 26, 2020 7:52 PM

जळगाव : आज दुपारी जळगाव शहरात भरधाव कंटेनरचा थरकाप आणणारा थरार बघायला मिळाला. मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाने अनेक वाहनांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार बघून रस्त्यावरील सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.

या घटनेत कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही. या घटनेतील मद्यधुंद कंटेनर चालकाने शहरातील पोलीस चौकीला धडक दिली. येथेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (39) रा. क-हे वडगाव, ता.आष्टी जि. बीड असे पोलिसांच्या ताब्यातील मद्यधुंद कंटेनर चालकाचे नाव आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. रस्त्याचा अंदाज न घेता भरधाव कंटेनर येत असल्याचे पाहून अनेकांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत काही जण जखमी देखील झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment