चोरीची मोटारसायकल खरेदीदार अटकेत

On: January 27, 2022 2:45 PM

जळगाव : चोरीची मोटारसायकल खरेदी करणा-या फरार आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सॅलवीन विरेंद्रसिंग ठाकुर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. जळगाव शहरातील कालिका माता मंदीर परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनला मोटार सायकल चोरीचा एक गुन्हा सन 2020 मधे दाखल आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी मुकुंदा डिगंबर सुरवाडे (रा. भुसावळ) यास यापुर्वी अटक करण्यात आली असून मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. मुकुंदा सुरवाडे याने चोरी केलेली मोटार सायकल सॅलवीन ठाकुर याने खरेदी केली होती. तेव्हापासून सॅलविन फरार होता. तो जळगाव शहरात आला असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. संजय धनगर, पो.ना. विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, योगेश बारी व पो.कॉ. चंद्रकांत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment