जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): “इंडियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स” अंतर्गत निमास या संस्थेच्या विविध कोर्समधे व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग” हा एक कोर्स आहे. हा कोर्स सहिष्णा सोमवंशी या कन्येने यशस्वीरित्या पुर्ण केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सहिष्णा ही भारतातील सर्वात कमी वयाची कन्या ठरली आहे. पाचोरा तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी व सुप्रिया सोमवंशी यांची सहिष्णा ही कन्या असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय सैन्य दलाची “नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनींग ए लीड स्पोर्ट्स (निमास) ही संस्था डिरांग अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सिमेवर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेत भारतातील विविध राज्यातून महीला आणि पुरुष अकरा दिवसाचा कोर्स पुर्ण करण्यासाठी येत असतात. आपत्कालीन परिस्थितीत बचाव करण्यासाठी भारतीयांनी सक्षम होण्याचा या कॅंपमधील कोर्सचा उद्देश असतो. या कोर्समधे पर्वतारोहन, कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडींग, बायकींग, व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग आदी कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. शुन्य तपमानात हा कोर्स पुर्ण करावा लागतो. सैनिकांप्रमाणे तंबूत राहून जेवण करणे व थंड पाण्यात राफ्टींग आदी उपक्रम या प्रशिक्षणादरम्यान करावे लागतात. या प्रशिक्षणासाठी कित्येक पालक आपल्या मुलांना पाठवत नाही. विदेशात अशा कोर्सला मोठी मागणी असून त्यात इंडीयन आर्मीतील प्रशिक्षक प्रथम क्रमांकावर असतात. त्यामुळे भारतीय सैन्यातील अनुभवी प्रशिक्षकांचा यात समावेश असतो.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सहिष्णा ही भारतातून सर्वात कमी वयाची मुलगी ठरली आहे. आपल्या यशाचे श्रेय ती प्रशिक्षकांसह आपले पिताश्री सचिन सोमवंशी, आई सुप्रिया तसेच आजी व आजोबा यांना देते. अकरा महिलांचा सहभाग असलेल्या पथकात सहिष्णाने आपले प्रशिक्षण पुर्ण केले. यठिकाणी जाण्यासाठी सहा ते सात हजार किलोमिटरचा जिवघेणा खडतर प्रवास पुर्ण करावा लागतो. सहिष्णाचे पाचोरा शहरात आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत तिचे स्वागत करण्यात आले.
प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना धाडसी होण्यासाठी हा कोर्स करण्यासाठी पाठवावे असे सहिष्णाने म्हटले आहे. या कोर्समुळे आपल्या मनात मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास निर्माण होतो असे देखील तिने “क्राईम दुनिया”सोबत बोलतांना म्हटले आहे. ज्या कुणाला हा कोर्स करण्याची इच्छा असेल त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचे देखील तिने “क्राईम दुनिया” टीमसोबत बोलतांना म्हटले आहे. “क्राईम दुनिया” च्या पथकासोबत मुलाखती दरम्यान तिने प्रशिक्षण कालावधीतील विविध अनुभव कथन केले. महाराष्ट्र शासनाने या कोर्ससाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अनुदान द्यावे असे देखील तिने म्हटले आहे. त्यातून विद्यार्थ्यांची एक चांगली पिढी तयार होण्यास निश्चितच मदत होईल.