युवाशक्ती फौंडेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे शहिदांना श्रद्धांजली

On: July 26, 2020 10:06 PM

जळगाव : 21 व्या कारगिल विजय दिनानिमित्त आज सायंकाळी सहा वाजता काव्यरत्नावली चौकात वीरगती प्राप्त झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मेणबत्ती लावून पुष्प अर्पण करण्यात आले. दर वर्षी कारगिल विजय दिनानिमित्त युवाशक्ती तर्फे युद्धात शहीद झालेल्या शूरवीरांच्या कुटुंबाला बोलावून प्रेरणादायी कार्यक्रम घेण्यात येतो.

मात्र या वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सदर कार्यक्रमात बदल करण्यात आला.यावेळी फिजीकल डिस्टन्सचे पालन करून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.या वेळी युवाशक्ती चे संस्थापक विराज कावडीया, आशा फौंडेशनचे गिरीश कुलकर्णी, प्रितम शिंदे, अर्जुन भारुळे, पियुष तिवारी, उमाकांत जाधव, पंकज पाटील, भवानी अग्रवाल, सौरभ कुलकर्णी, मयूर जाधव आदी देशभक्त नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी भारत माता की जय, शहिद अमर रहे या घोषणा देण्यात आल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment