ऑडीओ क्लिप प्रकरणी दोघे पोलिस निलंबीत

On: January 31, 2022 11:05 AM

अहमदनगर : वसुलीच्या विषयावरुन व्हायरल झालेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या ऑडीओ क्लिपची वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दखल घेतली असून दोघा पोलिस कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले आहे. पोलिस नाईक लक्ष्मण वैरागळ आणि पो.कॉ.योगेश राऊत असे श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनमधील निलंबीत करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

श्रीरामपूर उप विभागाचे डिवायएसपी संदीप मिटके यांनी आपला अहवाल पोलिस अधिक्षकांना पाठवला होता. त्या अहवालाच्या आधारे दोघा कर्मचा-यांवर निलंबन कारवाई करण्यात आली. निलंबन कालावधीत दोघांना मुख्यालयाच्या अधिन रहावे लागेल व त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment