अकोला : चौकशीकामी ताब्यातील सराफ व्यावसायीकासोबत अनैसर्गीक कृत्य केल्याच्या तक्रारीनंतर पाच पोलिस कर्मचा-यांना अकोला जिल्हा पोलिस अधिक्षकांनी निलंबीत केले आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव येथील एका सराफ व्यावसायीकाला चोरीचे सोने खरेदी केल्याच्या आरोपाखाली 9 जानेवारीच्या रात्री ताब्यात घेतले होते.
चौकशीदरम्यान सोने चोरी प्रकरणातील दोघा संशयीत आरोपींना आपल्यावर अत्याचार करण्यास लावले असा आरोप सराफ व्यावसायीकाने केला होता. अकोला आणि बुलढाणा पोलिसांच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. सोने चोरी गुन्ह्याच्या तपास पथकातील कर्मचारी प्राथमीक स्तरावर दोषी आढळल्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस शिपाई शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, मोंटी यादव, काटकर आणि चालक पवार अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जामीनावर बाहेर आल्यानंतर सराफाने घडलेल्या प्रकाराबाबत सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.