अती थंडीमुळे चार बेघरांचा जळगावला मृत्यू

जळगाव : जळगाव शहरात सध्या थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दारे खिडक्या बंद करुन देखील थंडीचे अस्तित्व जाणवते. थंडीचा कडाका असह्य झाल्यामुळे उघड्यावर दिवस काढणारे चार बेघर जळगाव शहरात मृत्युमुखी पडले आहेत. सोमवार 31 जानेवारीच्या मध्यरात्री नंतर जळगाव शहरातील तपमान सुमारे साडेसात अंशापर्यंत घसरले होते. या गारठ्यात चौघे बेघर सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

शहरातील पांडे डेअरी चौक, निमखेडी रस्ता, रेल्वे स्टेशन व जिल्हापेठ परिसर अशा ठिकाणी चौघे बेघर आढळून आले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या चौघांच्या अंगावर झोपतांना जेमतेम पांघरुण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here