जालना : जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले स.पो.नि.संग्राम ताटे गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाले आहेत. दहा मिनिटात परत येतो असे पत्नीला सांगून घराबाहेर गेलेले सहायक पोलिस निरिक्षक संग्राम ताटे अद्यापही घरी परत आलेले नाहीत.
त्यांचा मोबाईल घरीच असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या असून सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जात आहे. मित्राला भेटण्यासाठी पत्नीला सांगून बाहेर गेलेले स.पो.नि. संग्राम ताटे यांनी सोबत वाहन, मोबाईल वा पाकीट नेले नाही. त्यांची कोकन विभागात पदोन्नती झाली असून त्यांच्या बेपत्ता होण्याचे कारण अद्याप अनाकलनीय आहे.