हर्सूल कारागृहात कैद्याची आत्महत्या

On: February 8, 2022 11:31 AM

औरंगाबाद : पत्नीची हत्या केल्याप्रकरणी हर्सूल कारागृहात जन्मठेपेची सजा भोगणा-या कैद्याने फाशी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेप्रकरणी हर्सुल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. अशोक रमेश जाधव (45) रा. सुरळी, ता. गेवराई, जि.बीड असे आत्महत्या करणा-या मयत कैद्याचे नाव आहे.

बंदीवान अशोक जाधव याने जुने सर्कल 16, बॅरेक 7 येथील शौचालयात असलेल्या पाण्याच्या लोखंडी पाईपाला रुमालाच्या मदतीने गळफास घेत आपले जीवन संपवले कारागृह वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मयत घोषित केले. सन 2018 मधे पत्नीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली होती. त्याची मानसिकता बिघडलेली होती. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment