धुळे : राज्य महिला आयोगांतर्गत राज्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात महिला समुपदेशन केंद्र सुरु केले जाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर राज्यातील पहिले समुपदेशन केंद्र लवकरच धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात सुरु केले जाईल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धुळे येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलतांना याबाबतची माहिती दिली आहे.
“महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रुपाली चाकणकर धुळे जिल्हयाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. धुळे जिल्हा रुग्णालयात तृतीय पंथीयासाठी स्वतंत्र वैद्यकीय कक्ष सुरु केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तसे निर्देश त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले.